विनंती
उठ राजसा,पाहा ही प्रभात झाली
उघड नयन, तू या शयन महाली
झोपला होतास, डाराडूर खयाली
जाग रे, स्वप्नातुनी हसुनी गाली
रुचकर पदार्थच खाऊनी या उदरी
खाऊनी पावभाजी किंवा भेळपुरी
वाढवी वजन तुझे, बघ लंबोदरी
करावयास नियंत्रण, बरे त्यावरी
उठुनी फिर तू, सकाळच्या प्रहरी
पायाने चाल, तीन चार मैलावरी
जाईल वेळ, तास दीड तासावरी
पण उत्साह,संचारेल तुज शरीरी
उत्साहित पाहुनी असाच तुजला
आनंद किती होईल मम मनाला
म्हणुनी राजसा, विनवते तुजला
उघड नयन, जाण्यास फिरायला
No comments:
Post a Comment