18 May, 2007

कुणास ठाऊक?

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाहीडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाहीतिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊनतिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊनचंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं
कुणास ठाऊक?तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील.

अश्रूंनाही मोल असतं

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना.
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना...
कण-कण जगतांना..........

14 May, 2007

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

हसता हसता डोळे लगद भरुनही येतील.
बोलता बोलता शब्द ओठी जातील.
ही विरुन कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही.
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही....
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता.
"एका" सारखेच दिसू लागतील.
सहज बघता बघताअवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल.
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल.
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही.
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही....
मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल.
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल.
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास.
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास.
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही.
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही....
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका.
घरचे म्हणीतील सारखा कसा लागतो.
उठता बसताचेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे.
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे.
सांगुण द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही.
"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...."

सावली आहे मी तुझी

आज उन्मळुन पडलो वादळात मी,
तुझ्या अंगणी होतो पारीजात मी...
तूझे येणे येता येता राहुन गेले,
होतो त्या वळणावर वाट पहात मी...
पालविच्या स्वप्नांवरती जगलो तरीही,
झडतच गेलो प्रत्येक वसंतात मी...
कट्यांनी निदान नाती जपली असती,
उगाच गुंतलो होतो पाकळ्यात मी..
निखा-याची धग आता जाणवत नाही,
इतके दिवस होतोच की वणव्यात मी...
सावली आहे मी तुझी, म्हणाली होतीस...
म्हणुन आयुष्यभर राहीलो उन्हात मी...
संपलो नाही कधीच मी पुरून उरलो होतो.
विझलो नाही पुन्हां मी विझुन पेटलो होतो.
तुझ्या श्वासाने झालो मी पुन्हां निखारा
त्या राखेत कोळसा मी बनुन पडलो होतो.
तुला वाटले माझी राख झाली ती कधीची
धुरावाटे त्या आभाळास मी भिडलो होतो.
कोसळला नाहि तो पहीला पाऊस तेव्हां
पावसाआधी ढगातुन त्यावेळी मी बरसलो होतो.
स्वखुशीने तुही भिजलिस सरीत आसवाच्यां
तुझ्या खुशीसाठी मी डोळ्यात साठलो होतो.
तुला जाण नाही आसवाच्या चवेची आजही
तो सागर नव्हता त्यात मी विरघळलो होतो.
गंध होता हवेत माझ्या अस्तित्वाचा नेहमी
श्वासावाटे तेव्हां तुझ्या मी काळजात शिरलो होतो.
तुला वाटले मी दुर गेलो आता भेट नाही
मनात डोकावल नाहीस मी मनात मुरलो होतो.
जेव्हां ओघळलीस तु डोळ्यावाटे मीही मुक्‍त झालो
इतके दिवस तुझ्या मी डोळ्यात उरलो होतो.
नेहमीच राहीन जिवंत असा तुझ्या आठवणीत
देह संपला तरी तुझ्या मी देहात साठलो होतो.
तु कणा कणात शोधलस मी क्षणा क्षणात होतो...

सार्‍यांना मी वेड्यात काढणार आहे

सार्‍यांना मी वेड्यात काढणार आहे,
लैला-मजनू, शिरी-फ़रहादसार्‍यांना मी वेड्यात काढणार आहे,
त्यांनी कबरी बांधल्या असतीलमी मात्र चैतन्यमंदिर बांधणार आहे,
स्वतःला कुणी सोमरसात बुडवलंमी प्रितीचा अमृतरस चाखणार आहे,
कितिकांनी जिवही दिला असेल,
मी त्याच प्रेमाखातर जगणार आहे,
प्रेम असफ़लच होतं नेहमी यालाच एक गैरसमज ठरवणार आहे,
कुणी माझ्यावर करावं की नाही हे ज्याच्या त्याच्यावर सोडणार आहे,
कैकजण इतिहासजमा झालेत मी नक्कीच इतिहास घडवणार आहे,
त्याच्यापायी झुरणारे असतील,
मी प्रत्यक्ष चंद्राला घरी आणणार आहे,
प्रेम पुरतं आंधळं असतं म्हणे,
मि तर त्यालाच डोळे बनवणार आहे,
त्यात आपसुक पडतात म्हणे,
मी घट्ट पाय रोवून उभा रहाणार आहे,
आजवर सार्‍या करुण कहाण्यामी माझी यशोगाथा लिहिणार आहे,
बहूदा सारे वेडे मजनू होतातमी मात्र अजिंक्य होणार आहे ......

12 May, 2007

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नकामृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे,
असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजूनमग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी..............

11 May, 2007

कळत होते जवळ येताना
कि हे सुख क्षणिक आहे
वळत नाही अजुनही
कि हे दु:ख क्षणिक नाही
तू म्हणालीस मी तुला कधी विसरणार नाही
मी म्हणालो मीही कधी तुला विसरणार नाही
अर्धसत्यच ठरले ते
कारण मी तुला विसरलोच नाही !!!!
मनात माझ्या अघटित घडले
प्रेमकाव्य मज स्फ़ुरु लागले
कुणी म्हणाले उरलेसुरले
शहाणपण तुज सोडून गेले
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं
तेव्हा टाळू म्हणून टळत नाही
आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात
संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात
प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं
मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं

कधीतरी

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...
कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...
कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...
कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...
कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...
कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलोयातच मग मला समाधान असेल...
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे,
कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाही,
डोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही,
किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडू,
तुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू,
येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेस,
स्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस,
आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहून,
तरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन,
माझं काय विचारतेस आता माझी कविताही थकली आहे,
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे,
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर,
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर,
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर,
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर,
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर,
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर,
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर,
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर,
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर,
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर,
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर,
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर,
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर,
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर,
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधीपण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर......

गंध आवडला फुलाचा म्हणून..................

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणूनफूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
परक्यांपेक्षा आपलीच माणसंआपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतूनविश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हाआपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपलं सुःख पाहण्याचा तसाप्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणंहा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावरखरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपल्याला कोणी आवडणंहे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं...
मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतंते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतंवेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षावेळीच त्याला आवरायचं अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं..

मी जगतॊय आजही

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस
तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठीपण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीसमला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस
तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठीपण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीसमला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस

बघ माझी आठवण येते का......

आता तुझा प्रत्येक क्षण माझ्या अस्तित्वापासुन दुर असेल...
वर वर तु निच्छित असशील...
मनात मात्र दुःखांचा पुर असेल...
काही दिवसांनंतर हा पुर ओसरेल...
कुठल्यातरी बेसावध क्षणी...
पुन्हा पाऊल घसरेल...
पुन्हा कोणीतरी आवडू लागेल...
पुन्हा डोळे झुरतील...
मनात मात्र तुझ्या तेव्हा...
माझेच उसासे असतील...
वाट बघ प्रेमाची भावना उफ़ाळून येते का..?
त्या क्षणी नकळत का होईना...
बघ माझी आठवण येते का...?
किंवा कदाचित असंही होईल...
तुला एखाद स्थळ सांगुन येईल...
दोन्ही घरची बोलनी होतिल...
दोन्हीकडून होकार असेल...
घरात जरी 'हो' म्हटलस तरी...
मनात तुझ्या 'नकार' असेल...
पुन्हा मन दुबळ होईल...
स्वतःची बाजू मांडायला...
अपयशी ठरलं म्हणुन वेडं...
तुझ्याशीच लागेल भांडायला...
भांडण मिटेपर्यंत कदाचित...
अंगावरती हळद चढेल...
आपण नक्की काय करतोय...?
तुझ्या मनाला कोडं पडेल...
सनईच्या सुरावर, वाजत्रांच्या तालावर...
नव्या घरात प्रवेश होईल...
क्लेश होऊ देऊ नकोस...
असेल त्याचा स्विकार कर...
तुझ्यावर आता जवाबदारी आहे...
याचाही तेव्हा विचार कर...
अंगावरची हळद आता बघ हळूह्ळू उतरते का...?
पिवळ्या पाण्याकडे लक्ष गेल तर बघ...
माझी आठवण येते का...?
दिवसामागून दिवस सरतील...
वर्षामागून वर्षे जातील...
नव्या आयुष्यामध्ये पुन्हा...
नवी नाती निर्माण होतील...
नव्या नात्यांच्या नव्यापणात...
आपले नाते जुणं होईल...
नात्याप्रमाणेच हळूहळू...
मनसुद्धा सुनं होईल...
माझ्या सुन्या मनात मात्र...
फ़क्त तुच उरशील माझ्यासारखीच...
एकदिवस तू सुद्धा झुरशील....
बघ एखादी पाऊलवाट तुला माझ्या आठवणींकडे नेते काय...?
बघ.. सुकल्या झाडाला पुन्हा नव्याने पालवी फ़ुटते काय...?
आयुष्यात आतापर्यंत निदान निखळ 'मैत्री' तरी उरते काय...?
आणि आयुष्यात एकदातरी बघ माझी आठवण येते का.....?

Sweet Heart

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी