19 May, 2010

स्वप्न

बाहुल्यांचे स्वप्न होते
सोनेरी किरण व्हावे
स्वप्नात का असेना
बोलणे तरी मुक्त व्हावे

बोलणे बंद होते
दिवसही काळा होता
रात्र तर काळीच होती
स्तब्धता जागीच होती

पहाटेच्या शांततेला
एकदाचा तडा गेला
मौन त्यांचे भंग होता
यत्न त्यांचा सार्थ झाला

No comments: