व्यर्थ
वाहवा करीत मद्यपेले रिचवणारे खूप होते .
अन भग्नस्वप्नांचीही नक्षी मांडणारे खूप होते .
ती अशी सोडुन गेली की जणू नव्हतीच कधी
"खोटेच सारे प्रेम " ऐसे बोलणारे खूप होते .
वाटले मी एकटा , नाही कुणीही सोबती
हसरा मुखवटा घालुनी चालणारे खूप होते ,
मांडला संसार जेव्हा मी व्यथांचा ह्या इथे
"ही मुक्तके, नाही गजल "हे सांगणारे खूप होते .
रे प्रसादा व्यर्थ ही भाबडी कविता तुझी
हरवून गेल्या गालिबांचे ऐसे तराणे खूप होते .
No comments:
Post a Comment