एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी
No comments:
Post a Comment